कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, शिवसेना आमदाराची मागणी

Pratap Sarnaik - Kangana Ranaut

मुंबई : महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केल्याप्रकरणी शिवसेनेनं (Shiv Sena) अभिनेत्री कंगना रानौतविरोधात (Kangana Ranaut) अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. कंगनावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना आमदाराकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कंगना रनौतने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे. सोबतच त्यांनी सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचाही तपास करण्याची मागणी उचलून धरली आहे.

प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, कंगना रनौत मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना तालिबान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. याबाबत मी विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात देखील अनेक ड्रग्जचे धागेदोरे समोर येत आहेत. कंगनाने अनेक फिल्म स्टारवर ड्रग्जचे आरोप केलेत आणि त्या फिल्स स्टारने देखील कंगना ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली.

शिवसेनेने सुरुवातीपासून कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. विधानसभा अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना २४ तासात याबाबत भूमिका घ्यावी असे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील २४ तासात या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER