कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

file-sedition-case shivsena demand over Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे म्हटले होते. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगनाविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सोलापूर शहर शिवसेनेच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे .

कंगनाच्या बेताल वक्तव्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला आहे. मुंबईमध्ये राहून करोडो रुपये कमवायचे, नावारूपास यायचे व त्याच महाराष्ट्राला व मुंबईला ड्रगमाफियाशी जवळीक ठेवून बेताल वक्तव्य करायचे. अशा व्यक्तींचा महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदोबस्त केला पाहिजे. कंगना रणौत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून वेळीच कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इतकेच नाही तर शिवसेनेने भाजप आमदार राम कदम यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER