… म्हणून अजित पवार आणि जयंत पाटलांवर FIR दाखल करा, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

Ajit Pawar-Jayant Patil-Chandrashekhar Bawankule

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona Crises) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सरकार मात्र पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. अशा बैठकांमुळे कोरोना विषाणू सुपर स्प्रेडर बनत आहे. पण याकडे सरकारातील नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे (FIR) दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण ग्रामीण भागातील जनता चिडली आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर ग्रामीण भागातील लोकं रस्त्यावर उतरतील. वीज प्रश्नावरही ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही 10 हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आणि वास्तव मांडू असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या केंद्रसरकारची एक टीम राज्यात फिरत आहे, पण महाराष्ट्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

कोरोना विषाणूचे कारण सांगून विरोधकांना आंदोलन करण्यापासून रोखलं जातंय. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही, तर आम्हीही असेच वागू असा इशाराही भाजप नेते बावनकुळे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button