योगगुरूंनी माफी न मागितल्यास ‘१ हजार कोटीं’चा दावा दाखल; ‘IMA’ची बाबा रामदेवांना नोटीस

IMA-Baba Ramdev

नवी दिल्ली : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (IMA) योगगुरू बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची मानहानीची नोटीस बजावली आहे. रामदेव (Baba Ramdev) यांनी ‘अ‍ॅलोपॅथी’ (Allopathy) संदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून IMA ने नाराजी व्यक्त केली आहे.

IMA उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून मंगळवारी बाबा रामदेव यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत त्यांनी लेखी माफी मागवी. तसेच, व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा. त्यांच्या या वक्तव्यामुळे IMAशी निगडीत २ हजार सदस्यांची मानहानी झाल्याचे पत्रात नमूद केले आहे. “बाबा रामदेव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून त्यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानिसाठी ५० लाखनुसार, एकूण १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल. सोबतच एफआयआरही दाखल करण्यात येईल.” असे खन्ना यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, ही नोटीस मिळाल्यानंतर ७६ तासांच्या आत कोरोनावर रामबाण उपाय म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या ‘कोरोनिल’च्या सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात याव्यात, अशी मागणी IMAने केली आहे. तसेच, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि कारवाईसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही IMAने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button