राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटेंविरोधात गुन्हा दाखल

Anil Gote Resigns

धुळे :- पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमठाणे गावात जाहीर कार्यक्रममध्ये अनिल गोटे (Anil Gote) यांनी पोलिसांबद्दल बेताल वक्तव्य केलं होत. त्याविरोधात हा गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

पोलीस दलाची प्रतिमा व अब्रू मलिन केल्याचा त्यांचायवर आरोप आहे. चिमठाणा येथे दहशत मुक्त शिंदखेडा अभियानाअंतर्गत आयोजित सभे दरम्यान अनिल गोटे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जिल्हा दौऱ्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या गृह खात्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अनिल गोटे यांनी अनेक सभांमध्ये वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या वादग्रस्त विधानांची मोठी चर्चा असते. एकेकाळी भाजपमध्ये असलेले अनिल गोटे यांनी यापूर्वीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची ऑफर…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER