भाजपाविरुद्ध स्वबळावर लढा; चंद्रकांत पाटलांचे मविआला आव्हान

Chandrakant Patil - Mahavikas Aghadi

मुंबई : कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळे लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाची किती बोलण्याची पात्रता आहे, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी मविआमधील पक्षांना दिले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Election Result) निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये पाटील म्हणालेत की, महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाची किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आघाडी विरोधात भाजपा अशा प्रतिष्ठेच्या झालेल्या या लढतीत भाजपाने बाजी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button