स्वातंत्र्याची लढाई इंग्लंडच्या संसदेत लढण्यासाठी, फक्त पाच मतांनी निवडून आलेला पहिला भारतीय खासदार!

Maharashtra Today

इंग्रजांची भारतावर सत्ता होती आणि गोरे अधिकारी भारतीयांना तुच्छतेने वागवत. त्यावेळी दादाभाई नौरोजींनी इंग्लंडच्या संसदेत ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये (House of Commons) इंग्रजांविरुद्ध निवडणूक जिंकून विक्रम प्रस्थापित केला होता. गुजरातच्या पारसी परिवारात जन्मलेल्या दादाभाईंनी एक शिक्षक ते उद्योजक ते राजकारणी अशी यशस्वी वाटचाल केली होती.

४ नोव्हेंबर १८२५ला मुंबई प्रांतात त्यांचा नवसारी कुटुंबात जन्म झाला. दादाभाई १८५५ला इंग्लंडला गेले तिथं त्यांनी कामा अँड कंपनीच्या लंडन शाखेत नोकरी सुरु केली. याआधी ते मुंबईच्या एल्फिन्स्टन संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक नोकऱ्या बदलल्या पण ते ज्याही क्षेत्रात होते तिथे त्यांनी काम केलं तिथं नाव कमावलं. यानंतर त्यांनी कॉटन ट्रेड कंपनी सुरु केली तीचं नाव होतं, ‘दादाभाई नौरोजी अँड कंपनी (Dadabhai Naoroji & Company).

स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरुच ठेवला. शिक्षकीपेशा आणि व्यवसाय सांभाळत त्यांनी नेहमी काही न काही वाचायला वेळ काढला. याच क्रमात त्यांनी भारतावर इंग्रजांच्या आर्थिक प्रभुत्वामुळं होणाऱ्या मोठ्या नुकसानीची त्यांना जाणीव होती. याबद्दलचं त्यांचं वाचन आणि अभ्यास आश्चर्यकारक होता. अनेक अर्थतज्ञ आणि व्यवसायिक दादाभाईंच्या अभ्यासामुळं तयार झाले. दादाभाईंनी हा अभ्यास १९६७ला त्यांची ‘इकॉनोमिक्स ड्रेन थ्येअरी’ मध्ये प्रकाशित केली. भारताच्या उत्पन्नाचा मोठा वाटा इंग्लंडला जात असल्यामुळं, भारताचा आर्थिक स्तर ढासळल्याचं त्यांनी जनतेच्या निदर्शनात आणून दिलं. १८६७ला त्यांनी ‘इस्ट इंडीया असोसिएशनची’ स्थापना केली होती. या संघटनेनं पुढं जावून ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच’ रुप घेतलं. या पक्षानं आश्वासन दिलं होतं की भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार भारतासह इंग्रजांच्या देशातही केला जाइल.

इंग्रजांच्या कानावर आपला आवाज पोहचवायचा असेल तर त्यांच्या संसदेत भारतीयांचा आवाज घुमला पाहिजे असं त्यांच मत होतं. १८८५ला ते म्हणाले होते की आपल्याला आपली मुख्य लढाई लंडनच्या संसदेत लढली पाहीजे. १८८६ ला इंग्लंडच्या संसदेची निवडणूक त्यांनी लढवली. त्याकाळच्या प्रतिष्ठित ब्रिटन लोकांनी दादाभाईंना समर्थन दिलं. तीथे त्यांना १९५० मतं मिळाली तर विरोधी उमेदवाराला ३६५१ मतं मिळाली. तत्तकालीन इंग्लंडचे प्रधानमंत्री लॉर्ड सेलस्बरी यांनी वर्णभेदावर आपली मतं व्यक्त केली होती. याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, एका कृष्णवर्णीय भारतीयाला संसदेत स्थान देण्यासाठी आम्ही अजून तयार नाही. पंतप्रधानांना या वक्तव्यामुळं मोठ्या टिकेला सामोरं जावं लागलं तर दुसऱ्या बाजूला दादाभाईंच्या नावाची लंडनमध्ये चांगली चर्चा होऊ लागली.

पुढच्या सहा वर्षांपर्यंत दादाभाईंनी लंडनमध्ये चांगला जनाधार मिळवला होता. त्यांनी परंपरावादी प्रधानमंत्र्यांचा विरोध केला. ते पुन्हा निवडणूकीला उभे राहिले. यावेळी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, चित्तरंजन दास आणि मोहम्मद अली जिन्नांसारख्या प्रभावी युवा विद्यार्थ्यांचं लंडनमधून समर्थन प्राप्त झालं होतं. १८९२ला पुन्हा निवडणूक झाली. ते फक्त ३ मतांनी निवडून आले. यावेळी तत्कालीन पंतप्रधान लॉर्ड सेलस्बरी यांनी पुन्हा मतगणना करण्याचे आदेश दिले. मतमोजणीत खरंच चुक झाली होती. ते ३ मतांनी नाही तर ५ मतांनी निवडूण आले होते.

या विजयामुळं ते पहिले भारतीयच नाही तर इंग्लंडच्या संसदेत प्रवेश मिळवणारे पहिले आशिया खंडातले व्यक्ती बनले.

इंग्लंडच्या संसदेत त्यांच्या पहिल्या भाषणाची आजही अनेक जण आठवण काढतात. त्यांनी वेळोवेळी भारतीय कामगार आणि शेतकऱ्यांची बाजू इंग्लंडच्या संसदेत मांडली. भारतावर होणाऱ्या अत्याचारांची जाणीव त्यांनी इंग्रजांना करुन दिली. दुष्काळ आणि पुराशी भारतीय समाज त्यावेळी मोठा संघर्ष करायचा. इंग्लंडमधून त्यांना चांगली आणि पुरेशी मदत जावी यासाठी ते प्रयत्नशील होते.

दादाभाई नौरोजींबद्दल बोलताना टिळक म्हणाले होते की, “२८ कोटींच्या लोकसंख्येपैकी १ व्यक्ती इंग्लंडच्या संसदेत भारतीयांची बाजू मांडतोय आपण सर्वांनी दादाभाईंना समर्थन दिलं पाहिजे.” दादाभाईं इंग्लंडमधून भारतात परतल्यानंतर, मुंबईच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा वाटा होता. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही भारताची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या दादाभाई नौरोजींनी ३० जून १९१७ला, वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईत शेवटचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER