कोरोनाविरुद्ध लढा, पंतप्रधानांशी नाही; झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना डॉ. हर्षवर्धनांचे प्रत्युत्तर

Dr. Harshvardhan - PM Narendra Modi - Hemant Soren

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) काळात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली. त्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हेमंत सोरेन यांना प्रत्युत्तर दिले आहे. ही वेळ कोरोनाविरुद्ध लढण्याची आहे. पंतप्रधान मोदींशी लढण्याची नाही, अशा शब्दांत डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी सोरेन यांना खडेबोल सुनावले. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करत हेमंत सोरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“मुख्यमंत्री हेमंत सोरेन कदाचित आपल्या पदाची गरिमा विसरले आहेत. कोरोना महामारीच्या स्थितीवर बोलताना आणि पंतप्रधानांवर वक्तव्य करताना त्यांनी हे विसरू नये की, या महामारीचा अंत सामूहिक प्रयत्नांनीच शक्य आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींवर बोलणे निंदनीय आहे. केंद्राने संकटाच्या काळात गरीब आणि गरजू लोकांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटते की, सगळी कामे केंद्रांने करावी. कोरोना विरुद्ध लढा, पंतप्रधानांविरुद्ध नाही.” असा संताप डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला.

मोदींनी ‘मन की बात’ची टेप लावली – हेमंत सोरेन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशीही चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, “आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त ‘मन की बात’ केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट करायला हवी होती आणि कामाचे ऐकले असते, तर बरे झाले असते.” यासंदर्भाचे सोरेन यांनी ट्विटसुद्धा केले आहे. त्यानंतर आता हे ट्विट चर्चेचा विषय बनला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button