आरक्षण मिळवण्यासाठी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्या – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

मुंबई : मराठा आरक्षणप्रकरणी (Maratha reservation) वातावरण तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा राजकारणी नेत्यांवर आरोप केला – राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको आहे!

आंबेडकर म्हणाले, “राज्यात २८८ पैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. त्यांचे एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध असून ते नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत.” 

गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला होता. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आता  कोर्टात आहे. श्रीमंत मराठे सत्ता असतानासुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत. त्यामुळे माझे गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवे. त्यांनी असे केले तरच त्यांना आरक्षण मिळेन अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावे.” असे आंबेडकर म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER