कोरोनाविरुद्धची लढाई संपलेली नाही, पवारांनी व्हिडीओ शेअर करत दिला इशारा

Sharad Pawar

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव दिवसेंनदिवस कमी होताना दिसून येत आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही कमी होताना दिसत आहे. मात्र कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. शरद पवार हे सातत्याने ट्विटरवरुन कोरोनाची जनजागृती करत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आपली कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप सुरूच आहे, असे पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

देशात अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सूरू झाली असून सर्वकाही पूर्ववत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची कोणतीही आकडेवारी हातात नसताना दिवाळीपर्यंत राज्यात संपूर्ण अनलॉक करणे धाडसाचे पाऊल ठरेल, असा सावधगिरीचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करताना हा व्हिडिओ पाहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER