सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

dead body

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. कणकवली तालुक्यातील एका 60 वर्षीय पुरुषाचे कोरोनामुळे मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात निधन झाले आहे. 20 जून पासून ते कोरोनावर उपचार घेत होते. त्यांचा पहिला नमुना निगेटिव्ह आला होता. तर दुसरा नमुना पॉझिटिव्ह आला होता. गेले 10 दिवस ते व्हेन्टीलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात २१४ कोरोनाबाधित पैकी पाच व्यक्तींचे निधन झाले आहे. १५२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. एक रुग्ण मुंबई येथे गेला आहे. त्यामुळे ५६ रुग्ण सक्रीय राहिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER