पाचवी-आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर; वर्षा गायकवाड यांचा निर्णय

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार होती. मात्र, कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण विद्यार्थी-पालकांमध्ये होते. दरम्यान, विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्य वेळी कळविण्यात येईल. याबाबतचे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिलला आयोजित केली होती. मात्र, परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागाने २३ मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता पुन्हा परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

“यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण ४७ हजार ६६२ शाळांनी नोंदणी केली आहे. पाचवी-आठवीचे मिळून एकूण ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३ मे रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी शिष्यवृत्ती पाचवी व आठवीची परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख योग्य वेळी कळविण्यात येईल.” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button