कोल्हापुरात कोरोनाचा पाचवा बळी

Kolhapur Coronavirus Death

कोल्हापूर : कोल्हापूरला शनिवारी रात्री कोरोनाने आणखी एक बळी घेत जोरदार धक्का दिला. हेब्बाळ जर्दाळ येथील एका व्यक्तीचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा कोरोनाव्हायरसचा पाचवा बळी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरस च्या बाधित व्यक्तींच्या संख्येत धोकादायक पद्धतीने वाढ होते आहे. आज दिवसभरात 49 नव्या व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील या रोगाच्या रुग्णांची संख्या या 556 अशी धोकादायक पातळीवर पोहोचली असताना आज रात्री हेब्बाळ जर्दाळ येथील एका व्यक्तीचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे या रोगाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या पाच वर गेली आहे या घटनेमुळे चिंतेचे सावट अधिक गडद झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER