फिफा वर्ल्ड कप : फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने नमवले

कजानः पोल पोग्बोच्या 81 व्या मिनीटातील गोलमुळे माजी चॅम्पियन फ्रान्सने आशियाई टीम ऑस्ट्रेलियाच्या कडव्या आव्हानानंतर आज 2-1 ने विजय मिळवत फिफा जागतिक फुटबॉलच्या स्पर्धेत ग्रुप सी मध्ये विजयी सुरुवात केली. 2016 ची युरो चॅम्पियनची उपविजेता चमू फ्रांसला ऑस्ट्रेलियाकडून आज कडवे आव्हान मिळाले.

दोन्ही चमू 1-1 ने बरोबरीत असताना शेवटच्या 10 मिनीटात प्रवेश केल्यानंतर मिडफिल्डर पोग्बो ने निर्धारीत वेळेतील 9 मिनिटे बाकी असताना ऑस्ट्रेलियाच्या बॉक्समध्ये गोलकीपरच्या वरून लॉब खेळला जो पोस्टच्या आतील भागात लागून गोलमध्ये गेला आणि नंतर बाहेर आला. मात्र व्हिडिओ रिव्हू ने स्पष्ट केले कि चेंडूचा गोल लाईनच्या आत टप्पा पडला होता.