फिफा विश्वचषक : फ्रांसची क्रोएशियावर 4-2 ने मात

मॉस्को: फिफा विश्वचषक २०१८ च्या फायनल सामन्यात फ्रांसने क्रोएशिया 4-2 ने पराभव केला. सामन्याच्या पूर्वार्धात दोनही संघांकडून जोरदार अॅक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या १८ व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला.

त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र ही आघाडी जास्त काळ टिकली नाही. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. याचा फ्रान्सने लाभ घेतला. अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी राखली.