आता 2022 मध्ये भारतातच होणार महिलांची विश्वचषक फूटबॉल स्पर्धा

FIFA U-17 Women's World Cup 2020

जागतिक फूटबॉल (Football) नियंत्रण संस्था ‘फिफा’ने (FIFA) भारतात (India) आता होण्याचे नियोजन असलेली महिलांची 17 वर्षाआतील विश्वचषक फूटबॉल स्पर्धा (U-17 world Cup) रद्द केली आहे मात्र याच स्पर्धेचे 2022 साठी यजमानपद भारताला दिले आहे. नियोजनानुसार ही स्पर्धा आता म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्येच भारतात होणार होती पण ती कोरोनामुळे फेब्रुवारी- मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती आणि आता तर ती रद्दच करण्यात आली आहे.

फिफाने जागतिक पातळीवरील कोरोनाचा आढावा घेऊन हा निर्णय घेतला आहे. आता या स्पर्धा आणखी पुढे ढकलणे शक्य नसल्याने फिफा’ने 2020 मधील दोन युवा स्पर्धा आता रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 2020 साठी या स्पर्धांचे यजमानपद ज्यांना दिले होते त्याच देशांना आता 2022 मध्ये या स्पर्धांच्या यजमानपदाचा मान दिला आहे.

त्यानुसार आता फिफाची महिलांची 20 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये कोस्टा रिका देशात तर 17 वर्षाआतील गटाची स्पर्धा भारतात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER