२०२२ च्या विश्वचषक फूटबॉलचे वेळापत्रक जाहीर

Fifa World Cup 2022

जागतिक फूटबॉल नियंत्रण संस्था ‘फिफा’ने २०२२(FIFA World Cup 2022) च्या विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा प्रथमच कतार देशात होणार असून २०२२ मध्ये २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान सामने होणार आहेत. या स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग असेल. हे पूर्ण संघ अद्याप निश्रित झालेले नाहीत पण फिफाने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत प्रारंभीक गटवार सामने, त्यानंतर ३ ते ६ डिसेंबरदरम्यान उपउपांत्यपूर्व सामने, ९ ते ११ डिसेंबरदरम्यान उपांत्यपूर्व सामने, १४ व १५ डिसेंबरला उपांत्य सामने, १७ डिसेंबरला तिसºया स्थानाचा आणि १८ डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे.

या स्पर्धेत प्रारंभीचे गटवार सामने १२ दिवस होणार असून दररोज चार सामने होणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सामने मध्यरात्री १२.३० वा. दुपारी ३.३० वा., संध्याकाळी ६,३० वा, आणि रात्री ९.३० वा. सुरु होणार आहेत. उपांत्य सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.३० वा. तर अंतिम सामना व तिसºया स्थानासाठीच्या सामन्याला रात्री ८.३० वा. सुरुवात होणार आहे.

विश्वचषक फूटबॉलच्या इतिहासात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळली जाणारी ही पहिली स्पर्धा आहे. सलामीचा सामना अल बायेट स्टेडियमवर होईल. या स्पर्धेसाठीची मैदाने जवळ जवळच्याच शहरात आहेत त्यामुळे संघांना दोन सामन्यांसाठी विमान प्रवासाची गरज भासणार नाही असे फिफाने म्हटले आहे. अंतिम सामना दोहा येथील लुसैल स्टेडियममध्ये होईल. या स्टेडियमची क्षमता ८० हजार प्रेक्षकांची आहे.

या स्पर्धेचे आशिया व आफ्रिकेचे पात्रता सामने कोरोनामुळे अपूर्ण आहेत तर युरोप, अमेरिका व ओशियानियाचे अद्याप सुरुच झालेले नाहीत. मार्च २०२२ पर्यंत हे सामने पूर्ण होतील. त्यानंतरच सर्व ३२ संघ स्पष्ट होणार असल्याने त्यांचा ड्रॉ त्यानंतरच टाकला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER