गरिबांचं पोट भरणाऱ्या सुल्ताना डाकूवर इंग्रजी महिलाही होत्या फिदा

Sultana bandit - Maharastra Today
Sultana bandit - Maharastra Today

महात्मा गांधी परदेशात कायदा शिकायला गेले होते. त्यावेळी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या युपीतल्या एका खेड्यात मुलानं जन्म घेतला. आजपासून १२० वर्षांपूर्वी. पुढं जाऊन या पोरानं मोठी दहशत निर्माण केली. इंग्रजही या मुलाच नावं ऐकून थरथर कापायचे. सामान्य लोक त्याच्यावर जीव ओवाळत. आजही उत्तर प्रदेशातल्या लोकगीतांमध्ये, लोककथूतून तो डोकावत असतो त्याचं नाव ‘सुल्ताना डाकू.’

सुल्ताना डाकू काही मिथक कथा नव्हती. तो खरोखर होता. इतिहासाच्या पानांमधून तो लोकांना भेटत असतो. गुलाम भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यापैकीच एक होता सुल्ताना डाकू. त्याला भारताच्या करोडो लोकांच नेतृत्त्व करायचं नव्हतं. इंग्रजांची चापलुसी करु लोकनेता असल्याचा खिताब त्याला मिरवायचा नव्हता. त्याला लढणं माहिती होतं. तो लढला आणि एक डाकू क्रांतीकारी म्हणून नावारुपाला आला. त्याच्या लुटपाटीमुळं त्याच्या नशिबी जो गौरव यायला हवा होता तो त्याच्या पदरात पडला नाही.

इंग्रजी महिला त्याच्यावर जीव ओवाळाच्या

विसाव्या शतकातला सर्वात खतरनाक डाकू म्हणून सुल्ताना डाकूची नोंद आहे. महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरुनच त्यानं स्वतःच्या घोड्याचं नाव ‘चेतक’ ठेवलं होतं. १९२० सालच्या उत्तर प्रदेशातील मुस्लीम ‘भाटू टोळीत’ सुल्ताना डाकूचा जन्म झाला होता. काळ्या राखाडी चेहऱ्याच्या या जिगरबाज डाकूवर इंग्रजी महिला फिदा होता असं अनेकांनी लिहलंय.

सुल्ताना डाकूनं नाचगाणं करणाऱ्या ‘फुलक वॉर्न’ नावाच्या महिलेचं अपहरण केलं होतं. नंतर ती महिला पुतली बाई या नावानं ओळखली जाऊ लागली.

१७ व्या वर्षी बनला डाकू

सुल्ताना डाकू वयाच्या १७ व्या वर्षी डाकू बनला. कोवळ्या वयात खेळात आणि अभ्यासात दिवस काढायचे सोडून तो जीवावर खेळून इंग्रजांना नामोहरम करत होता. शोषित आणि मागास समाजासाठी सुल्ताना डाकू नायक होता. त्यांच्याच पाठिंब्याच्या जोरावर त्यांन एकाच वर्षात १०० डाकूंची टोळी बनवली होती.

उत्तर प्रदेशात दरारा

गरिबांनी रक्त आणि घाम गाळून पिकवलेला माल इंग्रज लुटायचे. संपूर्ण भारतात इंग्रज जुलुम करत होते. युपीच्या नजीबाबादमध्ये मात्र उलटं चित्र होतं. तिथं सुल्ताना डाकूची दहशत होती. नजीबाबादमधला इलाका नागरिकांसाठी जितका सुरक्षित होता इंग्रजी अधिकाऱ्यांसाठी तितकाच भयावह.

नैनीताल आणि देहरादूनचा रस्ता नजिबाबादमधून जायचा. इंग्रजांचा खजाना या वाटेवरुन जाताना दिसला की सुल्ताना डाकू संपुर्ण टोळीला घेऊन त्यांच्यावर तुटून पडायचा. खजाना लुटुन पसार व्हायचा. इंग्रजांकडून आणि श्रीमंतांकडून मिळालेली लुट सुल्ताना डाकू गोरगरिबांना वाटायचा. श्रीमंताना लुटून गरिबांच पोट भरणारा सुल्ताना डाकू तिथल्या लोकांसाठी देव बनला होता.

जमिनदारांना लुटणारा डाकू

सुल्तानानं मोठ मोठे दरोडे टाकले. सुल्तानाच्या मुस्क्या आवळणं हे एकमेव ध्येय इंग्रजी अधिकाऱ्यांच होतं. अशातच सुल्तानानं हल्द्वानीचा जमिनदार ‘खडकसिंह कुमडिया’च्या घरावर दरोडा टाकला. या लुटीनंतर इंग्रजी पोलिस अधिकाऱ्यांनी सुल्ताना डाकूला शोधण्याची मोहिम उघडली. मोठ्या तपासानंतर सुल्ताना डाकूला पकडण्यात त्यांना यश आलं.

इंग्रज अधिकाऱ्यानं सुल्तानाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते

सुल्तनाला अटक करणारा युवा इंग्रज अधिकारी ‘फ्रेडी यंग’ यानं सुल्तानाला अटक केल्यानंतर त्याला शिक्षा मिळू नये. त्याची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यात फ्रेडीला यश आलं नाही. सुल्ताना डाकूला त्याच्या मुलाला त्याच्यासारखं डाकू बनवायचं नव्हतं. त्यामुळं इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीनं सुल्तनाच्या मुलालला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. कोर्टानं सुल्ताना डाकूला फाशीची शिक्षा सुनावली. सुल्ताना डाकूला आश्रय देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या ४० कुटुंबांतील व्यक्तींना काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली.

अखेर ७ जुलै १९२४ साली सुल्ताना डाकूसह त्याच्या अन्य १५ साथिदारांना आग्र्याच्या तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. सुल्तनाला मदत करणाऱ्या ४० कुटुंबातील सदस्यांना देखील काळ्यापाण्याची शिक्षा झाली. गरिबांचा तारणहार आणि इंग्रजांचा कर्दनकाळ ठरलेल्या सुल्ताना डाकूचा सुल्ताना डाकूचा असा अंत झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button