शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरचा राजीनामा

Female doctor resigns

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरातील एक शिवसेनेचा माजी आमदार आणि माजी उपमहापौरांसह, कायर्कत्यांच्या दहशत आणि राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून सीपीआर हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टराने थेट नोकरीचाच राजिनामा दिला आहे. या डॉक्टरांनी राजिनामापत्रात संबंधित माजी उपमहापौरांच्या नावाचा उल्लेख केला आहे. याची माहिती मिळताच संबंधितांनी सीपीआरमध्ये येऊन यासंदर्भात चौकशी केल्याची चर्चा आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलने कोरोना काळात चांगले काम केले आहे. सीपीआरमधील महिला डॉक्टरांच्या पतीचा आणि एका माजी आमदार, माजी उपमहापौरांत वाद आहे. या वादातून हॉस्पिटलसमोर आंदोलनाचा प्रकारही घडला आहे. या साऱ्या प्रकाराला कंटाळून सीपीआरमधील त्या महिला डॉक्टरांनी सप्टेंबरमध्येच नोकरीचा राजिनामा दिला होता, पण कोरोना (Corona) असल्याने प्रशासनाने तो स्वीकारलेला नव्हता. महिला डॉक्टरांच्या या राजिनामापत्रात थेट त्या माजी आमदार अन् त्यांचाच कार्यकर्ता असलेल्या माजी उपमहापौराच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण नोकरीचा राजिनामा देत असल्याचे म्हटले आहे.

माजी आमदार अन् त्या डॉक्टरांतील वादाचा राग सीपीआरवर काढला जात आहे. त्या महिला डॉक्टरांनी अशा त्रासाला कंटाळून राजिनामा दिल्याची चर्चा आहे. घडल्या प्रकाराने सर्वसामान्य कोल्हापूरकरातून संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER