बाळाला कडेवर घेऊन महिला कॉन्स्टेबल करते वाहतूक नियंत्रण ! स्वराने शेअर केला व्हिडीओ

Swara Bhaskar

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर मीडियावर सक्रिय असते. कधी कोणावर टीका करते तर कधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या पोस्ट शेअर करते. स्वराने नुकताच बाळाला कडेवर घेऊन वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर तो चांगला व्हायरल होतो आहे.

स्वराने गगनदीप सिंग नावाच्या ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट केले आहे. या व्हिडीओत प्रियंका नावाची महिला कॉन्स्टेबल बाळाला कडेवर घेऊन ड्युटी  करताना दिसते. हा व्हिडीओ चंदीगडचा असल्याचे आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वराने टाळ्या वाजवण्याचे इमोजी वापरले आहेत; त्या महिला कॉन्स्टेबलचे कौतुक केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER