फीलींग फ्रेश !

Feeling Fresh

हाय फ्रेंड्स ! कालच्या” फिलिंग गुड “या लेखात आपण निराशेची भावना निर्माण होण्यासाठी ज्या विचार पद्धती कारण ठरतात याचा विचार करीत होतो .त्या प्रवृत्तीमुळे सकारात्मकता कोसो दूर पळून जाते आणि आपण नकारात्मकते कडे ढकलले जातो.

त्यापैकी एका “माईंड रिडींग “बद्दल आपण बघितले होते. परंतु त्याचा दुसरा भाग “फॉर्च्यून टेलर एररबद्दल “आज बघूया ! चिंता आजाराने ग्रस्त एखादी महिला मी खूप मानसिक आजारी (किंवा वेडी होईल तिच्या शब्दात) हे केवळ अकारणाचे गृहीत आहे. एखाद्या या मित्राला आपण फोन केला. त्याने रिटर्न कॉल केला नाही ,की लगेच आपण निष्कर्ष काढतो की आपण त्याला परत कॉल केला तर त्याला वाटेल त्यालाच फार गरज आहे. आणि मीच मूर्ख ठरेल वगैरे. प्रत्यक्षात असं लक्षात येतं की त्याला कुठलाही मेसेज मिळालेलाच नसतो.

6)मॅगनीफिकेशन आणि मिनिमायझेशन(Magnification and minimization): ही पण एक विचारांची पद्धत असते म्हणजे एखादी गोष्ट फुगवून सांगणे किंवा बघणे किंवा वा एखाद्या गोष्टीला अतिशय छोटा रूप देणे, सहजतेने बघणे. निराशाजनक दृष्टिकोन असणारी व्यक्ती विशेषतः स्वतःच्या चुका ,किंवा स्वतःकडे बघतांना जिथे आपण परफेक्ट नाही ,अशा ठिकाणी बघतांना त्या खूप मोठ्या चुका आहे अशा स्वरूपात बघते. आपल्या भीती ,चिंता या सगळ्यांचे भयानक रूपात प्रगटीकरण करते. अरेरे ! केवढी चुकलेली मी ! फारच भयंकर ! आता माझे नाव खराब होणार ! वगैरे नकारात्मक विचार करणारे लोक असा विचार करतात. स्वतःची शक्तिस्थाने, आपल्या गुणांकडे बघताना मात्र त्या अतिशय छोट्या किंवा बिनाकामाच्या किंवा अपूर्ण आहेत अशा पद्धतीने त्यांचे बघणे असते.

7) इमोशनल रीजनिंग(Emotional Reasoning): नकारात्मक भावभावना असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या भावनांनाच सत्य समजून चुकीचे लॉजिक लावतात. मला भीती वाटते म्हणून मी भित्राच आहे .किंवा मला माझा तो मूर्खपणा वाटला ,म्हणून मी मूर्ख आहे. अशा प्रकारचा कार्यकारणभाव खरे तर चुकीचा असतो .कारण भावनांचा परिणाम विचार व समजुतींवर होतो. जर त्या चुकीच्या असतील तर त्यांना वैध किंवा व्हॅलिड म्हणता येणारच नाही. मला अपराधी वाटतं म्हणजे मी काहीतरी वाईटच केले आहे, मला होपलेस वाटतंय म्हणजे माझा प्रश्न किंवा समस्या सोडवल्या बाहेरची आहे.

8) शुड स्टेटमेंट (Should statement) : बरेच लोकं स्वतःला मी हे करायला हवे, किंवा मी हे करायलाच हवे यासारख्या अपेक्षा स्वतःकडून करत राहतात आणि स्वतःला प्रेशर देत राहतात,किंवा दुसर्‍यांकडूनही त्या अपेक्षा करतात .पण त्या वारंवार फोल ठरतात. म्हणून बरेचदा ही शुड स्टेटमेंट वास्तविकतेच्या धारेवर घासून घ्यावी लागतात. तर आपण अपराधी भाव किंवा रागाच्या भावनेतून बाहेर पडू शकतो.

9) लेबलिंग किंवा मिसलेबलिंग (Labeling or miscellaneous) : व्यक्तिगत लेबलिंग म्हणजे स्वतःच्या चुकांसंदर्भात Labeling or miscellaneousपूर्णपणे नकारात्मक प्रतिमा तयार करणे होय. टोकाचे सामान्यीकरण करण्याचा हा एक अतिरेकी प्रकार म्हणता येईल. कुठल्याही माणसाचे मूल्यमापन त्याने केलेल्या चुकांवरून करणे योग्य नाही, कुठलीही एखादी गोष्ट त्यांनी चुकीची केली असू शकते याचा अर्थ तो माणूसच किंवा ती व्यक्ती चुकीची आहे असं असू शकत नाही .लहान मुलांच्या बाबतीत तर या लेबलींगच फार वाईट परिणाम होत असतो. त्यावरून आपल्या स्वतःची स्व प्रतिमा तयार करत असतात . म्हणूनच नेहमी चुकांबाबत नाराजी दाखवा ,त्या व्यक्तीविषयी नको . Dislike the action and not the actor !

Personalization10) पर्सनलायजेशन (Personalization) : कुठल्याही गोष्टीचा अपयशाला आपणच जबाबदार असल्याची समजूत व्यक्ती करून घेतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले आणि त्याचा रिपोर्ट कार्डवर जर त्याच्याबद्दल समाधान कारक शेरे मिळाले नसतील तर त्या अपयशासाठी आई स्वतःलाच जबाबदार धरते किंवा अपयशी समजते. मी कुठे कुठे कमी पडले ? असा विचार करते. स्वतःला केअरलेस किंवा बेजबाबदार समजते. पण ते योग्य नाही.
त्याचप्रमाणे एखाद्या थेरपिस्टने दिलेली असाइनमेंट क्लायंटने पूर्ण केली नाही , तर थेरपिस्टची ती जबाबदारी आहे असं मानलं जातं. कारण क्लाइंट दुरुस्त करणे ही त्याची जबाबदारी असते.

खरे तर कुठल्याही चुकीचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे हे जितके चुकीचे आहेत तेवढेच ते स्वतःच्या माती घेणेही चुकीचेच आहे.

आपण अशा समजुतीतील चुका,cognitive errors करत असतो आणि स्वतःला उगीचच निराश, दुःखी, चिंताग्रस्त करून ठेवतो .त्याचप्रमाणे काही चुका या विचारांच्या अविवेकी पद्धतीतून निर्माण होतात. त्याला Irrational beliefs असे म्हणतात हे साधारण तीन प्रकारचे असतात.
1) माझं काम नेहमी सर्वोत्तम झालंच पाहिजे.
2) इतरांनी मला नेहमी मी चांगलंच वागवलं पाहिजे.
3) जीवन माझ्याकरिता कष्टप्रद असुच नये.
या अविवेकी विचारांपासूनही दूर राहावे लागते. अशा चुकीच्या ,समजुती ,जाणिवा,गृहीत लक्षात घेऊन जर त्या दुरुस्त केल्या गेल्या तर बऱ्याचशा समस्या सुटू शकतात.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER