फेडरर मतलबी असल्याचा आरोप कोण करतंय?

Federer is selfish- Andrew Harris

कोरोनाच्या साथीमुळे जगभरात व्यावसायिक टेनिसचे सामने स्थगित आहेत आणि टेनिस पुन्हा सुरु व्हायचे असेल तर बंद स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय सामने खेळणे हाच एक पर्याय सध्यातरी आहे. त्यादृष्टीने विचारसुध्दा सुरु आहे पण 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह सर्वात यशस्वी टेनिसपटू असलेल्या रॉजर फेडररने या कल्पनेला विरोध दर्शविला आहे. प्रेक्षकांशिवाय सामने खेळायची मी कल्पनासुध्दा करू शकत नाही, असे फेडररने म्हटले आहे. त्याच्या या मताशी पेत्रा क्विटोव्हासह बरेच खेळाडू सहमतसुध्दा आहेत पण बरेच असहमतही आहेत. फेडररशी सहमत नसणारांपैकीच एक खालच्या क्रमांकाचा खेळाडू, अँड्र्यु हॉरिस, याने फेडरर हा स्वार्थी असल्याचा आरोप केला आहे.

फेडररच्या भूमिकेवर संतापलेल्या अँड्र्यु हॉरिसने म्हटलेय की, जेंव्हा सामने पुन्हा सुरु होऊ शकतील अशी स्थिती निर्माण होईल आणि जे खेळाडू काहीतरी कमावण्यासाठी धडपडत असतील त्यांच्याबद्दल काय? राॕजर फेडररचा हा शुध्द मतलबीपणा आहे.

टेनिसमध्ये क्रमवारीतील खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंचे उत्पन्न केवळ स्पर्धांतील सहभागावरच असते. स्पर्धा रद्द झाल्या तर त्यांचा कमाईचा मार्गच बंद होत असतो म्हणून प्रेक्षक असो वा नसो, वातावरण खेळण्यालायक असेल तर स्पर्धा झाल्या पाहिजेत असे या खेळाडूंचे मत आहे.

मात्र, याची दुसरी बाजूसुध्दा आहे. टेलिव्हिजनवर प्रत्येक सामना जरी दिसणार असला तरी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित प्रेक्षकांचा थेट प्रतिसाद, त्यांचा प्रतिसाद, त्यांची घोषणाबाजी व उत्साह असणार नाही. त्यामुळे सामन्यांतील जीवंतपणा निघून जाईल आणि सामने निरस, निर्जिव ठरतील, त्याचा परीणाम खेळाचा दर्जा व स्पर्धात्मकतेवर होईल असे अनेकांना वाटते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER