जाणून घ्या कोण म्हणतंय ‘फेडरर हा महान सोडा, दुसऱ्या स्थानीसुध्दा नाही ‘!

Federer

टेनिस जगतात रॉजर फेडररला सर्वकालीन महान खेळाडू (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम- गोट) मानले जात असले आणि त्याची कमाई व प्रशंसक सर्वाधिक असले तरी काही मंडळींना तो तेवढा ‘ग्रेट’ वाटत नाही. असे वाटणारांमध्ये काही माजी टेनिसपटूसुध्दा आहेत आणि त्यांच्याकडे त्याची कारणेसुध्दा आहेत.

ही बातमी पण वाचा:- त्यांना जेलमध्ये टाका’ म्हणणारा अमेरिकी टेनिसपटू होतोय ट्रोल 

फेडरर मानला जातो तेवढा महान नाही असे मानणारांपैकी एक आहे ऑस्ट्रेलियाचा माजी विम्बल्डन विजेता पॅट कॅश. त्याच्या मते नोव्हाक जोकोवीच व राफेल नदालसोबतच्या लढतींचा विचार करता फेडरर मागेच आहे.

पॅट कॅशने मांडलेल्या गणितानुसार नदालविरुध्द फेडररचे यश 40 टक्केच आहे तर जोकोविरुध्दच्या 50 पैकी 23 लढतीच त्याने जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याचे नजिकचे प्रतिस्पर्धी राफा व जोकोविरुध्दही सरस नसताना तो सर्वकालिन महान खेळाडू कसा ठरू शकतो असा प्रश्न पॅट कॅशने केला आहे.

सर्वजण म्हणतात की फेडरर सर्वात महान खेळाडू आहे पण तो तर दुसऱ्या स्थानीसुध्दा नाही. जर तुम्ही सर्वोत्कृष्ट असाल तर तुमच्या नजिकच्या प्रतिस्पर्ध्यांविरुध्द तुमची कामगिरी सरस असायालाच हवी. महानतेचा पहिला निकष तर हाच असायला हवा असे पॅट कॅशने म्हटले आहे. मात्र त्याची खेळाची लयबध्द शैली आणि त्याचा सहज खेळ अद्वितीय आहे. फटके मारण्यात त्याला तोड नसल्याचे त्याने म्हटले आहे. तरीसुध्दा त्याचा खेळ जुन्या शैलीचा आहे आणि इनडोअर्ससारख्या काही मैदानांवर तो तेवढ्या सहजतेने खेळत नाही असे पॅट कॅशने म्हटले आहे. त्याचे विक्रम जोकोवीच मोडेल, असे भाकितही कॅशने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER