फेडररचे हे अचाट करणारे विक्रम माहित आहेत का?

Roger Federer

रॉजर फेडरर (Roger Federer) हा एवढ्या वर्षांपासून प्रोफेशनल टेनिस (Tennis) खेळतोय आणि तो एवढा यशस्वी खेळाडू आहे की प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक सामन्यागणिक त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत असतात. सध्या सुरू असलेल्या फ्रेंच ओपनच्या (French Open) दुसऱ्या फेरीत त्याने मारिन सिलीचवर त्याने चार सेटमध्ये 6-2, 2-6, 7-6, 6-2 असा विजय मिळवला आणि या विजयासोबत एक असाधारण विक्रम नोंदवला. हा विक्रम असाधारण यासाठी की फेडररशिवाय इतर कुणाला तो जमलेला नाही.

ही बातमी पण वाचा:- सेरेनाची 24 व्या स्लॅम अजिंक्यपदाकडे दमदार आगेकूच

तो असा की, टेनिस जगतात ज्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळल्या जातात, अनुक्रमे ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन, या चारही स्पर्धांमध्ये त्याने सात खेळाडूंवर विजय मिळवले आहेत. अधिक स्पष्ट करुन सांगायचे तर मारिन सिलीचवर त्याने आता ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन स्पर्धानंतर आता फ्रेंच ओपनमध्येही विजय मिळवला आहे आणि अशा प्रकारे चारही ग्रँडस्लॅम मध्ये फेडररने मात दिलेला सिलीच हा सातवा खेळाडू आहे.

मारिन सिलीचच्या आधी त्याने नोव्हाक जोकोवीच, स्टॕन वावरिंका, टाॕमी रॉब्रेडो, मिखाईल युझ्नी, डेव्हिड नालबंदीयन आणि निकोलस किफर यांना चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये मात दिली आहे.

आपल्या कारकिर्दीत 22 वेगवेगळ्या वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धात किमान एकतरी सामना त्याने जिंकलेला आहे आणि तब्बल 347 वेगवेगळ्या प्रोफेशनल टेनिसपटूंशी तो किमान एकतरी सामना खेळला आहे. त्यामुळे फेडररच्या नावावर असे अचाट विक्रम लागणे स्वाभाविकच आहे.

22 वेगवेगळ्या वर्षात किमान एकतरी ग्रँड स्लॅम सामना जिंकून त्याने जिमी काॕनर्सला (21 वर्षे) मागे टाकले आहे. फेडरर 1999 मध्ये पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धात खेळला होता पण त्यावेळी तो फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये एकही सामना जिंकू शकला नव्हता. पण 2000 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने मायकेल चँगवर विजय मिळवून आपल्या यशाचा प्रवास सुरू केला होता. 2001 मध्ये त्याने फ्रेंच ओपन व विम्बल्डनच्या क्वार्टर फायनल गाठल्या होत्या आणि पहिले ग्रँड स्लॕम विजेतेपद 2003 मध्ये विम्बल्डनच्या रुपात पटकावले होते.

फेडररच्या नावावर ग्रँड स्लॅम स्पर्धांत 364 विजय असून 20 स्लॅम विजेतीपद आहेत.

फेडरर व काॕनर्सनंतर आंद्रे अगासीने 1987 ते 2006 दरम्यान 20 वर्षे किमान एकतरी स्लॅम सामना जिंकला आहे. राफेल नदाल व फेलिसियो लोपेझ यांच्या नावावर 19 वर्षे किमान एक स्लॕम विजयाची नोंद आहे. तब्बल 80 ग्रँड स्लॕम स्पर्धा खेळलेलाही फेडरर हा एकमेव खेळाडू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button