विजेतेपदांची तिहेरी ‘टाय’ फेडरर, जोको व राफा बरोबरीत

Sports News

टेनिस जगतातील पुरुष एकेरीवर गेल्या जवळपास एका तपापासून रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोव्हाक जोकोवीच या जोडीचेच राज्य आहे. गेल्या 10 वर्षात या तिघांनीच 40 पैकी 36 ग्रैंड स्लैम विजेतेपदं पटकावली आहेत. यावरुन त्यांच्या वर्चस्वाची कल्पना येते.

ही बातमी पण वाचा : नदालला आता लागलेत विवाहाचे वेध

आता राफेल नदालच्या यूएस ओपन विजेतेपदासह या तिघांच्या यशाबद्दल आणखी एक मनोरंजक बाब समोर आली आहे. ती म्हणजे टेनिस जगतातील प्रमुख स्पर्धांची या तिघांचीहीविजेतेपदे आता सारखीच आहे. या तिघांनीही आता प्रमुख टेनिस स्पर्धांची प्रत्येकी 54 विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत. यात ग्रैंड स्लैम, एटीपी फायनल्स आणि मास्टर्स 1000 स्पर्धांच्या विजेतेपदांचा समावेश आहे.

व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये ग्रैंड स्लैम स्पर्धा या सर्वात महत्त्वाच्या. ग्रैंड स्लैम स्पर्धा जिंकली तर भरघोस बक्षीस रकमेशिवाय विजेत्याला सर्वाधिक 2 हजार एटीपी गूण मिळतात. एटीपी टूर फायनल्स या वर्षअखेरीस होणाऱ्या स्पर्धेच्या विजेत्याला दीड हजार गूण मिळतात तर एटीपी मास्टर्स 1000 या ठिकठिकाणी होणाऱ्या स्पर्धांच्या विजेत्याला एक हजार गुणांचा लाभ होतो. म्हणून टेनिस जगतात या तीन स्पर्धा सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात.

ही बातमी पण वाचा : मेद्वेदेव फायनल हरला पण ओघवत्या भाषणाने जिंकला

अशा या तीन महत्त्वाच्या स्पर्धांच्या विजेतेपदांच्या बाबतीत योगायोगाने फेडरर-नदाल-जोकोवीच हे त्रिकूट अगदी बरोबरीवर आहे. तिघांचीही या तिन्ही प्रकारच्या स्पर्धांची आता प्रत्येकी 54 विजेतेपदं आहेत. यात अर्थातच ग्रैंड स्लैम विजेतेपदांबाबत (20) रॉजर फेडरर आघाडीवर आहे. एटीपी फायनल्समध्येही फेडररच सहा विजेतेपदांसह पुढे आहे तर नदालच्या नावावर सर्वाधिक 35 मास्टर्स् विजेतेपद आहेत.

या त्रिकुटाची विजेतेपदं

स्पर्धा फेडरर जोकोवीच नदाल

ग्रैंड स्लैम 20 16 19
एटीपी फायनल्स 6 5 0
मास्टर्स 1000 28 33 35
एकूण 54 54 54

ही बातमी पण वाचा : सेरेनाचे स्वप्न अधुरेच

ही बातमी पण वाचा : नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॕम स्पर्धा