मार्च महिन्यात कोरोना वाढण्याची भीती

Coronavirus

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना (Corona) रुग्णवाढ होत असताना काल, सोमवारी कोरोना रुग्णवाढीने काहीसा ब्रेक घेतला. राज्यात काल 6 हजार 397 रुग्णांची भर पडली. तर मुंबईत 855 नव्या रुग्णांची नोंद झाली, ठाणे जिल्ह्यात 567 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रोज 350 पर्यंत खाली गेलेली रुग्ण संख्या आता एक हजारापेक्षा जास्त नोंदवली जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतानाही रुग्णांचा आकडा 17 हजार 650 वर पोहोचला. मार्चमध्ये रुग्णांचा आकडा 25 हजाराच्या घरात जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम व मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतानाही 17 हजार 650 सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये अवघ्या 9 हजार 252 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी 2021 मध्ये रुग्णांची संख्या 14 हजार 802 इतकी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER