लाडाची लेक

Mithali Mayekar

कोरोनाच्या (Corona) काळात काहीवेळ मालिका आणि चित्रपटाच्या शूट ला बंदी घालण्यात आली होती पण आता सगळ्यांनी न्यू नॉर्मल म्हणत आपल्या कामाला मोठ्या उत्साहात सुरवात केली आहे. अनेक मालिकांचे शूट पुन्हा सुरू झालेत काही वाहिन्या नव्या कोऱ्या मालिकांसोबत आपल्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर ” देव माणूस ” आणि नुकतंच एक नव्या मालिकेचा प्रोमो आपल्या भेटीला आला आहे. ही नवी मालिका कोणती आहे बघूया ….

झी मराठी वर लवकरचं ” लाडाची मी लेक गं ” ही नाविकोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लॉक डाऊन नंतर शूट पूर्वपदावर आल्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जुन्या मालिकेतील काही वेगळे ट्विस्ट तर नव्या मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. १४ सप्टेंबर पासून ही नवी मालिका झी मराठीवर येणार असून या मालिकेत एक वेगळी जोडी बघायला मिळणार आहे.

अभिनेत्री मिताली मयेकर आणि स्मिता तांबे यांची अनोखी जुगलबंदी या मालिकेत अनुभवयाला मिळणार आहे. या दोघीच्या अभिनयाची वेगळीच शैली आहे आणि या दोघी आता एकत्र दिसणार आहेत. अभिनयाची वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणाऱ्या अभिनेत्री ” स्मिता तांबे ” यांनी आजवर अनेक कमालीचे चित्रपट केले आहेत आणि आता त्या छोट्या पडद्यावर झळकणार आहे. चित्रपट , मालिका वेब सिरीज अश्या विविध क्षेत्रात आपल्या कामाची जादू दाखवून त्या आता आपल्याला छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. मराठीच्या सोबतीने त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील आपल्या कामाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. ” जोगवा ” या चित्रपटातील त्यांची भूमिका ही अफलातून होती. आता त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला या आगामी मालिकेतून अनुभवयाला मिळणार आहे.

” उर्फी ” या चित्रपटातुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेली तरुण अभिनेत्री मिताली मयेकर देखील या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असून तिची मुख्य भूमिका असलेली ही पहिली मालिका आहे. मिताली ने या पूर्वी झी युवा वरील ” फ्रेशर्स ” या लोकप्रिय मालिकेतून ती या आधी प्रेक्षकांना भेटली होती. मुख्य भूमिका असलेली ” लेक माझी लाडाची गं ” ही मिताली ची पहिली मालिका असणार आहे यासाठी ती देखील उत्सुक आहे. सोशल मीडियावर मिताली चांगलीच ऍक्टिव्ह असते आणि मिताली ही तिच्या बोल्ड लुक मुळे नेहमीच चर्चत राहते आणि तिच्या फॅन्स ने तिच्यावर आजवर भरभरून प्रेम केलं आहे. तिने आपल्या सोशल मीडियावरून या नव्या मालिकेचा प्रोमो शेयर करून ही आनंदाची बातमी आपल्या फॅन्स ना दिली आहे. अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटातून ती घराघरात पोहचली. अभिनायची उत्तम जोड गोड स्वभाव यातून ती नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेते. मराठी कलाविश्वात एक वेगळा चेहरा आणि अभिनयाची अनोखी शैली असलेली अभिनेत्री म्हणून मिताली ओळखली जाते.

या दोन्ही अभिनेत्री ची अनोखी ओळख आहे आणि अभिनयाच्या विविध कौशल्य असलेल्या दोन अभिनेत्री एकत्र दिसणार असल्याची उत्सुकता आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या दोन वेगळ्या अभिनय शैली असलेल्या अभिनेत्री सोबत असणार त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळणार यात शंका नाही.

” लाडाची मी लेक गं ! ” ही नवी मालिका नक्कीच काहीतरी वेगळं विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईन असं म्हणायला हरकत नाही. दोन वेगवेगळ्या अभिनयाची शैली असलेल्या वेगळ्या अभिनेत्री सोबत येऊन काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. या दोघी नक्कीच सोबत येऊन काहीतरी भन्नाट करतील यात शंका नाही. या दोघी पैकी आता कोण कोणाचे लाड करणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER