पोलिओ मुक्त भारताचा पाया रोवणाऱ्या होत्या फातिमा इस्माईल!

Maharashtra Today

आज भारतानं पोलिओवर (Polio) मात केली आहे. पोलिओसारख्या संक्रमणकारी रोगाला रोखण्यासाठी विकसनशील भारताला बरीच मेहनत घ्यावी लागली. एककाळ होता जेव्हा दरवर्षी पन्नास हजारांहून अधिक मुलं भारतात पोलिओचा शिकार व्हायची. पण गेल्या सत्तर वर्षात पोलिओविरुद्धची लढाई लढून भारताला पोलिओमुक्त करण्याचं स्वप्न एका महिलेनं बघितलं आणि ते पुर्ण करण्यासाठी संपुर्ण आयुष्य वाहिलं

समाजसेवेची आवड

फातिमा (Fatima Ismail) यांचा जन्म झाला ४ फेब्रुवारी १९०४ ला. प्रसिद्ध गांधीवादी नेता उमर सोभानी यांचे ते भाऊ होते. एका राजकीय घरात वाढल्यामुळं त्यांना समाजाप्रति प्रेम होत. सार्वजनिक समस्यांवर काम करायला सुरुवात केली. यामुळं अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी महिला सक्षमीकरण आणि इतर गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात केली. याच क्रमात त्यांनी महिलांसाठी सुरु केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेक शिकायला सुरुवात केली. १९३६ च्या अखिल भारतीय महिला संमेलनच्या शिमला शाखेच्या सचिव बनाल्या. याच दरम्यान देशात इंग्रजांविरुद्ध स्वतंत्रता आंदोलन पुर्ण तीव्रतेने सुरु होतं.

फातिमाने यात भाग घेतला. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अनेक कॉंग्रेसी नेते नाव बदलून तिथं थांबत आणि इंग्रजांविरुद्ध रणनिती आखत असायचे. या नेत्यांमध्ये जयप्रकाश नारायण आणि अरुणा आसफ अली अशी दिग्गज नावं ही होती. इंग्रजांविरुद्ध संघर्षाला गती मिळाी तेव्हा १९४२ मध्ये गांधींच्या नेतृत्त्वाखाली भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली. याच वेळी फातिमा इस्मालने निकाह केला आणि त्यांच्या घरी मुलगी जन्मली.

मुलीला पोलिओ झाला आणि…

मुलीच्या जन्माच्या तीन वर्षानंतर १९४५ ला त्यांना कळालं की त्यांची मुलगी पोलिओग्रस्त आहे. वेळेत काही केलं नाही तर तिची प्रकृती अजून बिघडू शकते. उपचारांच्या शोधात फातिमा देशभर फिरल्या. त्यांना कळून चुकलं की मुलीची अवस्था सुधारण्यासाठी जास्ती काही करता येणं शक्य नाही. तरी त्यांनी हिम्मत हरली नाही. या दरम्यान त्यांना हजारो पोलिओग्रस्त मुलं पहायला मिळाली. तेव्हा त्यांनी निश्चय केला की त्यांच्या मुलीसाठी नाही तर सर्वांसाठी त्या काम करतील. दरम्यान फातिमा यांच्या पतीची बदली इराणला झाली त्या गेल्या नाहीत. भारतात राहून उपचार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मद्रासमध्ये एम. जी. किनी नावचे डॉक्टर आहेत. जे फातिमांच्या मुलीवर उपचार करु शकतात. हे कळल्या बरोबर त्यांनी मद्रासकडे कुच केली.

जेव्हा त्या मद्रासला पोहचल्या तेव्हा डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करायला नकार दिला. वारंवार फातिमांनी आग्रह केल्यानंतर ते इलाज करायला तयार झाले. आठ महिने त्यांच्या मुलीवर उपचार झाले. यानंतर त्यांना गरज होती फिजीओ थेरिपिस्टची. यासाठी त्या पुण्यात आल्या. पुणे फिजीओथेरिपीचं केंद्र हों, इथं जखमी इंग्रज सैनिकांवर उपचार होत असतं. त्यांच्या मुलीला फिजीओथेरेपिस्टकडून चांगला उपचार मिळाला.

पोलिओशी झुंजणाऱ्या मुलांसाठी उघडला दवाखान

फातिमा यांनी याआधी १९२० मध्ये व्हिएन्नात वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. घरची आर्थिक परिस्थीती नाजूक असल्यामुळं त्यांनी आभ्यास मध्येच सोडला. तरी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातलं बरचं ज्ञान घेतलं होतं त्यांना माहिती नव्हतं की त्यांच हे ज्ञान लाखो मुलांना पोलिओच्या शापातून मुक्त करणार आहे.

१९४७ ला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर त्यांनी मुंबईतल्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकत्रित करुन पोलिओच्या उपचारासाठी दवाखान उघडायचा आग्ह केला. आर्थिक बाजू भक्कम नसल्यामुळं त्यांच काम थांबलं. १९४७ पासून बंद पडत चाललेल्या पुण्यातल्या फिजीओथेरिपीच्या इस्पितळात त्यांनी हे काम शिकलं. यामुळं ८० मुलांना त्यांनी पोलिओतून त्या वर्षी वाचवलं.

फातिमा यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पोलिओची भारतातली स्थिती विषद केली. भारत सरकारला याचं गांभीर्य कळाल्यामुळं पुढं नेहरुंनी १९५३ ला पोलिओशी लढण्यासाठी हॉस्पीटलचं उद्घाटन केलं. १९५९ ला पोलिओ पोलिओग्रस्त मुलांच्या साठी शाळाही उघली. तिथं ३०० हून अधिक मुलं शिकत होती.

फातिमा यांच्या निस्वार्थ सेवेमुळं त्यांना १९५८ ला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यांनी फक्त त्यांच्या मुलांसाठी नाही तर भारतातल्या सर्व मुलांना पोलिओ मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा ४ फेब्रुवारी १९८७ ला मृत्यू झाला. २०११ ला भारतानं पुर्णपणे पोलिओवर मात केली यात फातिमा यांचे योगदान मोठे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button