
अकोला : काल रात्री खरप भागात जुन्या भांडणात सनातन आणि विजय क्षीरसागर या पिता-पुत्राचा खून करण्यात आला. सनातन आणि विजय हे दोघे रात्री ११ वाजता चौकात उभे असताना आकाश, धम्मपाल आणि जयपाल इंगळे या तीन भावांनी सनातन आणि विजय यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. सनातन आणि विजय घटनास्थळीच ठार झालेत. बराच वेळ दोघांचीही प्रेते रस्त्यावर पडून होती.
पोलिसांना माहिती मिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. आकाश, धम्मपाल आणि जयपाल इंगळे या तीनही भावांना ताब्यात घेतले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला