या बाप-बेट्यांची विरोधाभासी कारकिर्द नक्कीच चकित करेल!

Ken Rutherford & Hashim Rutherford

क्रिकेटमध्ये कितीतरी पिता-पूत्र आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात काही वडील चमकले आहेत तर काही मुले पण बऱ्याच जोड्यांमध्ये वडिलांनी मिळविलेल्या यशापुढे मुले फिकीच पडलेली दिसतात.

न्यूझीलंडचीसुध्दा अशीच एक पिता-पुत्रांची जोडी आहे ज्यात मुलाने सुरूवात तर दणक्यात केली पण तो सातत्य राखू शकला नाही. याच्या उलट पित्याची सुरुवात मात्र अतिशय डळमळीत झाली. पण पुढे जाऊन तो यशस्वी फलंदाज तर सिध्द झालाच, शिवाय त्याने कर्णधारपदही भूषवले.

अशी परस्परविरोधी कारकिर्द राहिलेले हे पिता-पूत्र म्हणजे केन रुदरफोर्ड (पिता) आणि हमिश रुदरफोर्ड (मुलगा).

यापैकी केन रुदरफोर्डने 1984-85 मध्ये कसोटी पदार्पण केले तेंव्हा विंडीजविरुध्दच्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत तो दोन्ही डावात भोपळासुध्दा फोडू शकला नाही मात्र त्याचा मुलगा हमिश याने 2012-13 मध्ये कसोटी पदार्पणातच इंग्लंडविरुध्द 171 धावांची खेळी केली.

मात्र यानंतरचे चित्र एकदम वेगळे आहे. केन रुदरफोर्डने पुढे जाऊन 56 कसोटी सामन्यात 2465 धावा केल्या आणि 18 सामन्यांत किवी संघाचे नेतृत्वसुध्दा केले.

हमिश मात्र त्या यशस्वी पदार्पणानंतर आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळलाय पण पदार्पणातील शतकानंतर तो केवळ एकदाच अर्धशतक पार करु शकला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बाप- बेट्यांची सरासरीसुध्दा जवळपास सारखीच (अनुक्रमे 27.06 व 26.96) आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला