हार्दिक व कृणाल पांड्या यांना पितृशोक

Himanshu Pandya passed away

नावाजलेले क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचे स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) व कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्या वडिलांचे, हिमांशू पांड्या (Himanshu Pandya) यांचे शनिवार, 16 जानेवारी रोजी सकाळी हृदयगती बंद पडल्याने निधन झाले. या दुःखद घटनेमुळे कृणाल घरी परतला आहे. सध्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो बडोदा संघाचे नेतृत्व करतोय आणि त्यामुळे तो बायो बबलमध्ये होता. बडोदा क्रिकेट संघटनेचे सीईओ शिशीर हट्टंगडी यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटलेय की हार्दिक व कृणाल यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

कृणाल मुश्ताक अली स्पर्धेत व्यस्त असला तरी हार्दिक सध्या घरीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER