उपवास महाशिवरात्रीचा – लंघन की दुप्पट व जड आहारसेवन ?

Maha Shiv Ratri

महाशिवरात्र (Maha Shivratri) आली की काय काय उपवासाचे पदार्थ करायचे याचा बेत सुरु होतात. खाऊन पिऊन उपवास करणार अशी घरात सर्वांची एकवाक्यता असते. रोजच्या जेवणापेक्षा वेगळे पदार्थ म्हणजे उपवास हा आजकाल फंडा आहे. कहर म्हणजे हॉटेल्समधे देखील उपवासची थाळी असे भरगच्च जेवण देखील सुरु झाले आहे. बरं या उपवासात येणारे पदार्थ काय तर फुगणाऱ्या साबुदाण्याचे पदार्थ, बटाटा रताळी मिल्कशेक, फ्रूट सॅलेड थालीपीठ, दहीवडे वगैरे वगैरे याची लिस्ट संपणार नाही. इतके नवनवीन पदार्थ यात जोडल्या गेले आहेत. हे सर्व पदार्थ उपवासाला चालतात हे कुणी सुरु केले हे अनाकलनीय आहे. प्रदेशाप्रमाणे घराच्या परंपरेने अनेक पदार्थ घेतल्या जातात, काही जोडले जातात. बरं उपवास केल्यानंतर शरीर हलके होणे, उत्साह वाटणे, मन प्रसन्न असणे, मल मूत्राचे विसर्जन योग्य होणे, भूक लागणे, शुद्ध ढेकर असणे हे अपेक्षित आहे. परंतु बरेच जण तक्रार करतांना दिसतात की जळजळ होतेय, पोट जड वाटतयं इ. उपवास या शब्दाचा अर्थ खरोखरच आपण लक्षात घेतो का? मग काय करता येईल की उपवासाचे फायदे आपल्याला मिळतील ?

लंघन वेगवेगळ्या प्रकारे करता येईल.
दिवसभर फक्त कोमट पाणी पिणे
दूध, ताक, किंवा मध पाणी घेणे
लाह्यांचे पाणी ( लाह्या सुंठ धणेपूड पिपली सैंधव अनारदाना घातलेले पाणी) घेणे.

भाजलेले धान्य सर्वात चांगला लंघन उपाय आहे. साळीच्या लाह्या, राजगिरा लाडू, राजगिरा भाकरी, दूध राजगिरा उपवासाला उत्तम पर्याय आहेत. भाजलेल्या वरईचा भात ताक देखील एक पर्याय असू शकतो.

डाळींब द्राक्ष मोसंबी घेऊ शकतो. महाशिवरात्रीला महादेवाची पूजा आराधना म्हणून उपवास केला जातो. मनात त्या देवाची भक्ति सात्विक भावना निर्माण होणे हे देखील तेवढेच महत्वाचे. पोट जड अॅसिडीटी असेल तर उपवासाच्या दिवशी उपासना करता येईल का? त्यामुळे पचायला जड, पाचनतंत्र बिघडविणारे पदार्थ घेण्यापेक्षा यावेळी शास्त्रोक्त लंघन करून शरीराच्या पचनसंस्थेला एक दिवस आराम देऊ या! उपवास या संकल्पनेला समजून उमजून स्वास्थ्य रक्षणार्थ उपयोग करूया !

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER