उपवासाचे दहीवडे

fasting dahivada recipe

उपवास आहे म्हणून काय झाले? काहीतरी सकस, पण खमंग खायला पाहीजेच ना. मग चला उपवासाचे दहीवडे बनवूया. कसे करायचे चला बघुया साहीत्य व कृती..

साहीत्य :- dahivada

  • शिजवलेला वरी तांदुळाचा मऊ भात १ वाटी
  • भिजलेला शाबूदाणा अर्धा वाटी
  • भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २ टेस्पून
  • राजगिरा पीठ २ टेस्पून
  • मीठ चविनूसार
  • हिरवी मिरची पेस्ट
  • तेल तळण्यासाठी
  • दही
  • भाजलेल्या जिर्याची पूड

कृती :- प्रथम एका पसरट बाऊलमधे भिजलेला शाबूदाणा व वरीचा भात एकजीव करून घ्या. आता त्यामधे दाण्याचे कूट,राजगिर्याचे पीठ, मिरची पेस्ट, थोडी भाजलेल्या जिर्याची भरड पूड व चविनूसार मीठ घालून सर्व मिश्रण हाताने एकजिव मळावे. आवश्यकता भासल्यास राजगिर्याचे पीठ कमी-जास्त करू शकता. जेणेकरून मिश्रणाचा खुटखूटीत गोळा बनवता आला पाहीजे. मिश्रण कडेला ठेवून द्या व वडे तळायच्या आधि २ चमचे दह्यामधे पाणी घालून पातळ ताक वडे बुडवण्यासाठी तयार करा. तसेच वड्यवर घालण्यासाठी घट्ट दही घुसळून त्यामधे चविला साखर व मीठ घालून एकत्र ढवळून घ्या. आता कढईत तेल गरम करा व आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटसर गोळे करून तांबूस रंगावर तळून टिश्यू पेपरवर काढा. नंतर खायला देतेवेळी आधि पातळ ताकामधे बुडवा. दोन -तीन मिनिटानी पाण्यातून काढून हलकेच हाताने दाबून पाणी काढा. व सर्व्हींग प्लेट मधे ठेवा व वरून तयार केलेले घट्ट दही घाला. त्यावर मिरचीपूड व जीरपूड भुरभूरा व खायला द्या. उपवासादिवशी असे थंड दहीवडे खायला खूपच छान लागतात. तेलकटही वाटत नाही. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील.

ही बातमी पण वाचा : उपवासाची पाणीपुरी

ही बातमी पण वाचा : उपवासात बनवा लुसलू़शित “रताळ्याचा हलवा”

ही बातमी पण वाचा : उपवासात बनवा गरमागरम ‘शिंगाड्याचा हलवा’