चंद्रकांत दादांचे निर्णयाविरोधात उपोषणाचा इशारा

Chandrakant Patil

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा निधी भाजपच्या तालुका अध्यक्ष मार्फत वाटपाचा निर्णय जाहीर केला. त्याविरोधात आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ मित्तल यांना निवेदन दिले. निधी वाटपाचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणाला बसतील असा इशारा या दोन आमदारांनी दिला.

हा निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधी आणि लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर आलेली गदा आम्ही खपवून घेणार नाही, दलित वस्ती निधी वाटपात बदल करावा, अशी मागणी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली जाणार आहे. जर हा बदल केला नाही तर, जिल्हा परिषदेसमोर कॉंग्रेस, राष्ट्रवादीआणि मित्र पक्षांचे सदस्य उपोषण करतील, असा इशारा दिल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे