१ जानेवारीपासून वाहनांना फास्टॅग अनिवार्य – नितीन गडकरी

Nitin Gadkari

दिल्ली :- टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांची लागणारी रांग टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वाहनांसाठी ‘फास्टॅग’ (FASTAG) आवश्यक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता १ जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य राहील. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

गेल्या काही वर्षांपासून वाहनांसाठी फास्टॅग लावणे आणि बंधनकारक करणे सुरू होते. परंतु, फास्टॅगची संख्या आणि देशात वाहनधारकांची संख्या यामुळे दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना फास्टॅग लावणे शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे काही दिवसांची मुदत देण्यात आली होती.

गडकरी एका कार्यक्रमात म्हणालेत, १ जानेवारी २०२१पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असेल. त्यामुळे वाहनांना टोलनाक्यांवर रोख टोल भरावा लागणार नाही. यात इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्हीची बचत होईल.

फास्टॅग संकल्पना २०१६पासून सुरू करण्यात आली. चार अधिकृत बँकांनी सुमारे एक लाख वाहनधारकांना फास्टॅग दिलेत. २०१७ मध्ये हा आकडा सात लाखांपर्यंत गेला. आणि २०१८च्या अंती ३४ लाखांवर जाऊन पोहोचला. नोव्हेंबर २०२० मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून १ जानेवारी २०२१पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले. १ डिसेंबर २०१७ च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग आहे.

फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला मोबाईलवर संदेश येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER