
नवी दिल्ली :- उद्यापासून महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक असणार आहे. तसेच आता फास्ट टॅग वापराला मुदतवाढ दिली जाणार नसल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज नागपुरात केली. आता सर्व गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी उद्या १५ फेब्रुरीपासून करण्यात येणार आहे. म्हणजे आज रात्री १२ वाजल्यापासून ही फास्ट टॅग अनिवार्य आहे.
याबाबत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार वाहनधारकांनी फास्ट टॅगचा वापर केला नसेल दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. याआधी १ जानेवारीपासून फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते; मात्र सरकारने याची मुदत वाढवून १५ फेब्रुवारी केली होती. देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टॅग जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ वाचेल.
फास्ट टॅग एक स्टिकर आहे जे तुमच्या गाडीच्या विंडस्क्रिनवर लावले जाते. हे स्टिकर कारच्या विंडशिल्डच्या आत लावले जाते. यात बारकोड असतो. डिवाईस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीचा वापर यात केला जातो, जी टोल प्लाझावरील स्कॅनरला कनेक्ट असते. गाडी पास झाल्यानंतर तुमच्या फास्ट टॅग अकाउंटमधील पैसे कट होतात. फास्ट टॅगला तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला जोडू शकता. ज्या ज्या ठिकाणी टोल लागेल तेव्हा तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतील.
जर वाहनधारकांनी गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तर मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला