वापरा स्टाईलिश काॅटन बॅग

Ladies Bags

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आल्यापासून पर्यावरणाला होणारा धोका आता कमी होईल यात काही शंकाच नाही. प्लास्टिक च्या पीश्व्यांचा सर्वात जास्त वापर स्त्रियांकडूनच होत असे. घरकाम, शापिंग, किचनकाम साठी प्लास्टिक च्या पिशव्या हे एकच पर्याय असे. आता  प्लास्टिक पिशव्यांच्या सक्ती झालीच आहे, तर ते मनापसून    स्वीकारुया आणि वापरूया स्टाईलिश कापडी पिशव्या…

  • टिफिन बॅग :- टिफिन बॅग साठी देखणी कापडी बॅग वापरता येईल. तुम्ही टिफिंच्या आकारानुसार बॅग निवडू शकता. ही बॅग कपड्यांनी बनवली असते. त्यामुळे तुम्ही या बॅगला वाॅश देखील करता येतो

टिफिन बॅग

  • मोंक बॅग :- या बॅग ला झोला स्टाईल असे ही म्हणतात. तुम्ही घरच्या घरी जुन्या साड्या किंवा ड्रेस कापड वापरून विविध रंगसंगतीचा मेळ साधणारी मोंक बॅग शिवता येईल.

मोंक बॅग

  • मार्केट  बॅग :- बाजारात जाताना आता सर्वानेच आठवणीने कापडी बॅग घेऊन जायची सवय लावूनच घ्यावी. खास मार्केट शाॅपिंगसाठी डिझाईन केलेल्या या बॅग्स पाहताच बाजारहाट करायला निघावेसे वाटते. खोलगट सुबक आकारातली ही बॅग तुम्हालाही आवडेल.

  • पिरॅमिड बॅग :- तुम्हाला नावावरूनच समजल असेल कि ही बग त्रिकोणी आहे. शिवालाही फारसी कठीण नसणारी या बॅगच्या एका कथेवर चेन असते. तर त्याच चेनच्या सुरुवातीला एक लूप दिला असतो. त्यामुळे बग हातात अडकवणे सोप्पे जाते. ही बॅग पर्स किंवा कॅरी बॅग म्हणून ही वापरता येते.

  • ड्रास्ट्रिंग बॅग :- ही स्टाईल नवीन नसली तरी आता काॅटन बॅग्सबाबत ती पुन्हा नवीन ट्रेंड होऊ पाहताय. काॅलेजसाठी किंवा पिकनिकच्या सामान त्यात सहज राहते आणि दोरीच्या सहाय्याने तिला छान लाॅक ही करता येते.