फॅशन 60’s फ्लोरल प्रिंटची

fashion

मागील ५ ते १० वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे. हीच पूर्वीची फॅशन परत येताना आता दिसत आहे. ६० व्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये “हिट’ ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे. फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या “लिवा” ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे. लिवा” खासियतच ही आहे की यामध्ये तयार होणारे कपडे कोणत्याही व्यक्तीला उठावदार दिसतील. आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टीनुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे. या फ्लोरल प्रिंट डिझाईन्स मध्ये काहीसा “रेट्रो” टच असल्याचे आपल्याला जाणवेल.

फ्लोरल प्रिंट्समध्ये आपल्याला कम्फर्टेबल अशाच कपड्यांचा वापर करण्यात यायचा. यामध्ये सिल्क आणि हलक्या वजनांच्या कापडाचा विशेषतः समावेश असायचा. “लिवा” हे नैसर्गिकरित्या तयार केलेले व्हिसकोस कापड या डिझाईन्समध्ये खासकरून वापरले जाते, जेणेकरून या कपड्यांमध्ये आपण अधिक कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्ट राहू. पूर्वी फक्त “वन पीस” किंवा “फ्रॉक” पेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती. यात फिक्कट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट आपल्याला स्टायलिश लूक देऊन जातो.

६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषा रेषांचे प्रिंट्स सुद्धा चर्चेत होते. आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे. फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते. यात व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स सध्या “इन” आहेत. तसेच पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनमध्ये फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषा रेषांचे प्रिंटचे कपडे आकर्षित करणारे आहेत.”लिवा” मुळे पूर्वी फेमस असलेली ड्रेसिंग स्टाईल आणि डिझाईन्स आपल्याला नव्याने “रेट्रो लाईफस्टाईल” मध्ये अनुभवायला मिळत आहे.