शेतकऱ्यांची चिंता वाढली; मुंबई-पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rainfall

मुंबई :- राज्यातल्या अनेक भागांत आज (शुक्रवार) अचानक पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. सकाळी ६ वाजल्यापासून मुंबईमध्ये पाऊस आहे. दादर, माटुंगा आणि माहीम भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळं रस्ते ओलेचिंब झाले होते आणि वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पश्चिम उपनगरातही ९ वाजण्याच्या सुमारास हेच चित्र होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या तीन  तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक ११, १२ आणि १३ डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER