शेतकऱ्यांना सोमवारपासून मिळेल नुकसान भरपाई – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळाणे सुरु होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

ते म्हणजे की, पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल व सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खातात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांसाठी पेरणी करायची असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही.

राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकार दिवाळीनंतर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत सध्या दिवसाला कोरोनाचे सहा हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. गोव्यातही अजून मंदिर सुरु झालेली नाहीत. तिथे कोणाचे सरकार आहे, असा टोमणा त्यांनी भाजपाला (BJP) मारला. मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यावरुन राजकारण सुरु असल्याने याबाबतचा निर्णय रखडला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER