शेतकरी थकून आपले आंदोलन संपवतील, हा केंद्र सरकारचा गैरसमज – नवाब मलिक

Farmers Protest - Nawab Malik

मुंबई :- कोरोना (Corona) संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचं आवाहन केलं असून आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आंदोलन सूरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

मागच्या सहा महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करतोय. या आंदोलनात शेकडो शेतकरी मरण पावले. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मोदी सरकारला सात वर्ष झाल्याच्या निमित्ताने आज तरी त्यांनी आंदोलनाची दखल घ्यावी. या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले त्याला सहा महिने पूर्ण झाले आहेत. आज शेतकरी काळा दिवस पाळत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह १४ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकांनीही आपला पाठींबा दर्शवत काळी फित लावून वा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध नोंदवावा, असे आवाहनही मलिक यांनी केले आहे.

तसेच नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्र सरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. विषय प्रलंबित ठेवून, शेतकरी थकून हे आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button