शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण, आंदोलनात सहभागी संत बाबा राम सिंह यांची आत्महत्या

Sant Baba Ram Singh

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषि कायद्याविरोधात मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. दिल्ली-हरियाणा बॉर्डर (सिंघू बार्डर) वर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आलेले संत बाबा राम सिंह (Sant Baba Ram Singh) यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा राम सिंह यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सांगितले जात आहे की संत बाबा रामसिंग हरियाणामधील करनाल येथे राहणारे होते. ट्विटर वापरकर्त्यांनी बाबांनी लिहिलेली सुसाइड नोटही पोस्ट केली आहे. असा दावा केला जात आहे की या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याविषयी उल्लेख केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER