आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी

मुंबई: आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असल्याचे परिवहन मंभी दिवाकर रावते यांनी सांगितले. केवळ परिवहनच नाही तर सर्वच विभागासाठी हा निर्णय लागू होणार असून शिवसेनेने ही मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याचे रावते म्हणाले.

आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना या नोक-या प्राधान्याने देणार असल्याचे ते म्हणाले. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर बीकेसीतच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीकेसीतच हे फायनान्शियल सेंटर होईल. त्यासाठी जेवढी जागा बुलेट ट्रेनसाठी द्यावी लागेल त्याचे पैसे घेतले जातील आणि या पैशातून फायनान्शियल सेंटरची इमारत बांधली जाईल, असे ते म्हणाले.