कंधार: रूई येथील शेतक-याची नापिकी व कर्जास कंटाळून आत्महत्या

Farmer Suicide In Rui

कंधार/प्रतिनिधी :- सततची नापिकी व कर्जास कंटाळलेल्या रुई येथील शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सततची नापिकी त्यामुळे आलेले आर्थिक संकट यातून संसाराचा गाडा चालवनच कठीण, आपल्या अंगावर असलेले कर्ज कसे फेडावे यास कंटाळून कंधार तालुक्यातील रुई येथील शेतकरी गोविंद मशनज मष्ण मष्णाजी तुडमे (वय 61 वर्ष) यांनी दि.1 ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले असता त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या वर उपचार सुरू असताना दि.3 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई गोविंद तुडमे यांच्या फिर्यादी वरून कंधार पोलिसात कर्जास व नापिकीस कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : नांदेड : बसस्थानकावरील महिला सफाई कामगाराला चिरडले; महिला ठार, बस चालकावर गुन्हा दाखल