खर्डा भाकरी खाऊन शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

Farmers Protest

कोल्हापूर :- शेतक-्यांना कर्जमाफी फक्त जाहीर झाली पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. गेल्यावर्षीच्या पूरामुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्या, कागदावर असणारी काराजमाफी प्रत्यक्षात आणा.

आदी मागण्यासाठी सरकारच्या अकार्यक्षमतेचा निषेध करत भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात खर्डा भाकरी खाऊन आंदोलन केले.

भाजप व किसान मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलनाला सुरुवात केली. भविष्यातही भाजप आणि किसान मोर्चाच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक पोकळ घोषणा केल्या आहेत. कर्जमाफी जाहीर केली, पण ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये जाहीर केले तेही मिळाले नाही. अशात गेल्यावर्षी पुरातून शेतीचे नूकसान झाले त्याचीही रक्कम दिलेली नाही. एकीकडे पिके गेली आणि दुसरीकडे शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी किंवा मदत निधीही दिलेला नाही. त्यामुळे शासनाचा निषेध केला जात असल्याचे भाजप आणि किसान सभेच्यावतीने सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना दुःखात ठेवून दिवाळी साजरी केली जात आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्य शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालीच नाही. पूराच्या नूकसानीची भरपाई दिलेली नाही. काहींना मिळाली तर बहुसंख्य लोकांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही. त्यामुहे शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा आंदोलन कर्त्यांनी निषेध केला.

किसान मोर्चाचे भगवान काटे यांनी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. ज्या घोषणा केल्या त्या तात्काळ पूर्ण केल्या पाहिजेत. आज शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. पण देशात सर्वच जण दिवाळी साजरी करत असले तरीही, शेतकऱ्यांना मात्र यंदाची दिवाळी कडू झाली आहे. याचा विचार शासनाने करावा. यावेळी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात पाचशे तर देशभरात पंधराशे कोटी ऊस बिल थकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER