शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ ; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिली हमी

Sharad Pawar - NCP

मुंबई : नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या ३४ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ३० डिसेंबर अर्थात उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंदोलक शेतकऱ्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली.

शरद पवार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाली. “३० डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत जर कोणताही तोडगा निघाला नाही तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ.” अशी हमी शरद पवार यांनी दिल्याचे शेतकरी नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले .

नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी (३० डिसेंबर) दुपारी २ वाजता बैठकीला बोलावले आहे. केंद्रीय कृषी खात्याचे सचिव संजय अग्रवाल यांनी शेतकरी संघटनांना चर्चेचे निमंत्रण पत्र दिले आहे.

ही बातमी पण वाचा : पंजाबमध्ये कंगनाचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शेतकऱ्यांची धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER