Farmers Protest : शेतकऱ्यांचा राज्यात चक्का जाम

Farmer Protest

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या शेतकरी आंदोलनाला नाशिकमध्येही पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूरमध्ये कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. जयहिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्याहून नाशिक महामार्गावर चक्का जाम केला आहे. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कृषी कायदे त्वरित रद्द करा, या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथे स्वाभिमानी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER