…त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवले होते का? अजित पवारांचा सेलिब्रिटींना संतप्त सवाल

Ajit Pawar

मुंबई :- संपूर्ण देश शेतकरी आंदोलनाने पेटला आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी बोललं जाऊ लागलं आहे. पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना अजित पवारांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे.

“सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलेलं होतं? आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी-वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिले.” अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला.

देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन करू पाहात आहेत आणि तुम्ही उलट खिळे मारताहेत. मारले की नाही, ही काय पद्धत झाली का? त्यातच अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडतात. ते समजू शकतो. कधी कधी पाण्याचे फवारे मारतात. बॅरिकेट्स लावता. सुरक्षा लावता, हेही आम्ही समजू शकतो. पण, तीन-चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. बारा-तेरा बैठका होऊन चर्चा निष्पळ होते. चर्चा करून विषय संपवायला काय होते? याचा अर्थ पुढे-मागे सरकण्याची तुमची (केंद्र सरकार) मानसिकताच नाही. घेतलेला निर्णय, असा अट्टहास आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना पटत नसेल तर लाखांचा पोशिंदा मागणी करेलच, असे अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मी कशाला नाराज होऊ ; काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER