
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे केंद्र सरकारविरोधात (Center Givt) आंदोलन सुरू आहे. मात्र, यावर काही तोडगा न निघाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. काल 72 वा प्रजासत्ताकदिन शेतक-यांच्या आंदोलनाने गाजला.
एकीकडे संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राजधानी दिल्ली मात्र हिंसाचारानं हादरली. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीचं ( Kisan Tractor Rally) आयोजन केलं होतं. मात्र या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. या हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आली आहे. भय्याजी जोशी (Bhayyaji Joshi) यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा हा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
‘प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये जी हिंसा आणि उपद्रव पाहायला मिळाला. तो अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल किल्ल्यावर झालेलं कृत्य देशाची स्वाधिनता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी बलिदान देण्याऱ्या व्यक्तींचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये अशा अराजकतेला काहीही स्थान नाही’, असं ट्वीट भय्याजी जोशी यांनी केलं आहे.
गणतंत्र दिवस के पवित्र दिन आज दिल्ली में जो हिंसा एवं उपद्रव हुआ वह अत्यंत ही दुःखद एवं निंदनीय है। विशेषकर ऐतिहासिक स्थल लालकिले पर हुआ कृत्य देश की स्वाधीनता और अखंडता की रक्षा के लिए बलिदान देने वालों का अपमान है। लोकतंत्र में ऐसी अराजकता के लिए कोई स्थान नहीं है।
1/2 pic.twitter.com/n3lLov3xnZ— RSS (@RSSorg) January 26, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला