शेतकरी आंदोलन : १४ ला सर्व शेतकरी नेते एकाच व्यासपीठावर करणार उपोषण

Farmers

दिल्ली :- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सर्व शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबर रोजी एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार आहेत, अशी घोषणा संयुक्त किसान आंदोलनाचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी केली.

आज आंदोलनाचा १७ दिवस आहे. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही या कायद्यांमधील दुरुस्तीच्या बाजूने नाही. केंद्राला आमचे आंदोलन उधळायचे आहे; परंतु आम्ही ते शांततेच्या मार्गाने सुरूच ठेवणार आहोत, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलन : घुसखोरी करणाऱ्या प्रतिबंधित संघटनेच्या लोकांना तुरुंगात टाका – टिकैत

आम्ही आमच्या माता-भगिनींनादेखील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. त्यांच्या राहण्यासह अन्य प्राथमिक सुविधांची सोय झाल्यानंतर आम्ही त्यांना या आंदोलनात सहभागी करणार आहोत. उद्या ११ वाजता राजस्थानमधील शाहजहांपूरपासून जयपूर-दिल्ली मार्ग रोखण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर मार्च काढणार आहेत, अशी माहिती पन्नू यांनी दिली.

पंजाबहून येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले – गुरनाम सिंह

शेतकरी नेते गुरनाम सिंह म्हणाले की, पंजाबहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॉली अडवल्या जात आहेत. आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहचू देण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहोत. सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर, आम्ही त्या दिवशी, गुरुतेग बहादूर यांच्या शहीद दिनी उपोषण सुरू करू.

अंबानी व अदानीच्या मालमत्तांवर धरणे – प्रेमसिंह गहलावत

दिल्लीच्या बुराडी निरंकारी मैदानावर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रेमसिंह गहलावत यांनी सांगितले की, पलवल आणि जयपूर मार्ग जयपूरहून आलेल्या संघटना आज बंद करतील. तसेच, अंबानी व अदानी यांच्या मालमत्तांवर आम्ही धरणे आंदोलन करू, जिओ सिम व जिओ फोनवर बहिष्कार टाकला आहे. हरियाणाचे टोल फ्री केले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER